लग्नमांडवात जाताना ‘ती’ने बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहेत. महाराष्ट्रातील 14 मतदारसंघात आज मतदान पार पडत असून, नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.

पुण्यातील श्रद्धा गजानन भगत या तरुणीने थेट स्वत:च्या लग्न मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. नववधू म्हणून नटलेल्या श्रद्धाने अप्पा बळवंत चौकातील नु.म.वि शाळेतील मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला.

तुळशीबाग परिसरात राहणाऱ्या श्रद्धाचा आज अमित सातपुते या तरुणासोबत विवाह होणार आहे. मात्र लग्नाला जाण्याआधी आज तिने आधी मतदानाचा हक्क बजावल्याने तिचे कौतुक केले जात आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.