Pune By-Election | चिंचवड भाजप राखणार पण कसबा हातून जाणार??; स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्चचा एक्झिट पोल काय सांगतोय?

Pune By-Election | पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुण्यातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकींचे राज्याच्या राजकारणात मोठे परिणाम दिसून येणार आहेत. चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार आश्विनी जगताप या विजयी होतील असं बोललं जात आहे.

कसब्यात पहिल्या फेरीपासू काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी मोठी आघाडी कायम ठेवली आहे. कसबा निवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्याच मुख्य लढत पहायला मिळाली आहे. हेमंत रासने हे पिछाडीवर आहेत.

30 वर्षानंतर कसबा हातचं निसटलं?

भाजपला तब्बल 30 वर्षानंतर कसबा हातातून गमाववं लागतं की काय असं चित्रं निर्माण झालं आहे. या निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने हे निवडणूक लढत आहेत. पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंबंधी, स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) आणि रिंगसाईड रिसर्च या दोन संस्थांचे एक्झिट पोल व्हायरल होत आहेत.

स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) आणि रिंगसाईड रिसर्चचा एक्झिट पोल

‘कसब्यामध्ये भाजपला धक्का बसणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर चिंचवडची जागा मात्र भाजप राखणार असून अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या विजयी होतील’ असं म्हटलं आहे.

कसब्यात भाजपला धक्का तर चिंचवडमध्ये भाजप जागा राखणार

स्ट्रेलिमा या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये कसब्यात भाजपला धक्का मिळणार आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे 15,077 मताधिक्यांनी विजयी होतील असं सांगितलं आहे. तर चिंचवडची जागा भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप या 32,351 मतांनी विजयी होतील. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 93,003 मतं तर अपक्ष उमेदवार 60,173 मतं मिळणार असल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.