Pune By poll Election | पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची नावे

Pune By poll Election | पुणे : पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याच्या तयारी दाखवली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत.

भाजपकडून पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबापेठ येथील पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांनी उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे.

 

दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) लढणार आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला आहे. आज शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडणार आहे. ज्येष्ठ नेत्यांशी स्थानिक नेते चर्चा करणार आहे. जर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तर चिंचवड शहरातून नाना काटे (Nana Kate), भाऊसाहेब भोईर (Bhausahen Bhoir) या नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे राहुल कलाटे (rahul Kalate) यांच्या देखील नावाची चर्चा रंगली आहे.

कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या ही निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर आणि कमल व्यवहारे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली पाटील ठोंबरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपच्या वतीने गणेश बिडकर, बप्पू मानकर, धीरज घाटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, स्वरदा बापट यांच्यापैकी एकाचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपकडून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील उमेदवार म्हणून त्यांचे सुपुत्र कुणाल टिळक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या