पुण्याचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशींसाठी अजित पवारांनी केला रोड शो

पुणे लोकसभा मतदारसंघाचं तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या मतदारसंघात महायुतीकडून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली असून, दुसरीकडे बापट यांच्याविरोधात महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. बापट यांचा जोरदार प्रचार सुरू असताना, आता मोहन जोशी यांनी देखील काल रोड शो करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वडगावशेरी भागात मोहन जोशी यांच्यासाठी रोड शो केला. यावेळी अजितपवारांसोबतच काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, उमेदवार मोहन जोशी तसेच कार्यकर्ते या रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.