InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

संघ स्वयंसेवक ते मंत्री, गिरीश बापट यांचा आजपर्यंतचा प्रवास

पुणे मतदारसंघात भाजपकडून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आला. दांडगा जनसंपर्क ही गिरीश बापट यांची जमेची बाजू, मागील 40 वर्षांचा राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले गिरीश बापट यांच्यावर विश्वास दाखवत भाजपने पुणे मतदार संघात गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट १९९५ पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

पालकमंत्री म्हणून  देखील बापट यांनी संयमित भूमिका पार पाडत शहरी आणि ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न हाताळला आहे. पुणे मेट्रोचा प्रश्न, PMRDA ( पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण महामंडळ) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसंच चांदणी चौकातील उड्डाणपूल अशा कामांचा सपाटा लावला आहे.

गिरीश बापट यांची खास ओळख ही पुण्याचे पालकमंत्री अशी असली तरीही, त्यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष, लोकलेख समितीचे अध्यक्ष,  संसदीय कामकाज मंत्री, अन्न पुरवठा मंत्री, अन्न औषध प्रशासन मंत्री असे विविध पदे बापट यांनी भुषवली असून, सध्या ते पालकमंत्री म्हणून कार्यरत आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या –

 

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.