Pune Crime | पुणेकरांनो सावधान! पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड

Pune Crime | पुणे: गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अशात पुन्हा एकदा पुण्यात वाहनांची तोडफोड झाल्याचे दिसून आलं  आहे. पुण्यातील अरणेश्वर भागात मध्यरात्री 10 ते 12 गाड्यांची तोडफोड झाली आहे.

Houses have been pelted with stones

अज्ञात टोळीकडून पुण्यातील (Pune Crime) अरणेश्वर भागात मध्यरात्री तोडफोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर या टोळीनं घरांवर दगडफेक देखील केली आहे. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली असून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

सातत्याने घडत असलेल्या या घटनांमुळे परिसरातील (Pune Crime) नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याचबरोबर वाहन मालकांना याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, 20 जून रोजी तळजाई परिसरात (Pune Crime) एका टोळीनं तब्बल 30 गाड्या फोडल्याची घटना घडली होती. 6 जणांनी तोंडाला रुमाल बांधून ही वाहन फोडली होती. या वाहनांमध्ये कार, टेम्पो, ऑटो रिक्षा इत्यादी वाहनांचा समावेश होता.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NsBTIb