आज १० वर्षांनंतरही आठवतो तो काळा दिवस !

बरोबर १० वर्षांपूर्वी…स्थळ- पुणे, तारीख १३ फेब्रुवारी २०१०. त्या बेकरीत नेहमीप्रमाणे ग्राहकांची गर्दी होती. कॉलजेची मुली – मूलं हसत खेळात आपला वेळ घालवत होते. एन्जॉय करत होते. संध्याकाळच्या सुमारास बाहेर पडलेले पुणेकर त्या बेकरीत आपल्या नातेवाइकांसोबत वेळ घालवत होते. आणि बरोबर ६ वाजून ५६ मिनिटांनी  एक धमाक्याचा आवाज झाला. आरडाओरड सुरू झाली, किंकाळ्या उठल्या, लोक सैरावैरा धाऊ लागले. हा काही साधासुधा स्फोट नव्हता, तर एक महाभयंकर दहशतवादी हल्ला होता.

लीबियामध्ये हवाई हल्ल्यात ; 40 जण ठार

पुण्यातील जर्मन बेकरी मध्ये झालेल्या त्या दहशवादी हल्ल्याला आज दहा वर्षे पूर्ण होत आहेत. असं असलं तरी त्यावेळच्या अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी अजूनही पुणेकरांच्या मनात कायम आहेत.  जर्मन बेकरीमध्ये माणसांचे मृतदेह सगळीकडे विखुरले होते. अनेकांची शरीरं जखमांनी भरली होती. सगळं काही रक्तबंबाळ झाले होते.

जर्मन बेकरी बॉंबस्फोटानंतर संपूर्ण शहर खडबडून जागं झालं. या बॉम्बस्फोटात 17 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. 56 नागरिक या स्फोटात जखमी झाले.  त्या दिवशी या परिसरात आणीबाणीची परिस्थिती होती. पुणे शहर पोलिसांसाठी हा मोठा धक्का होता. अशा हल्ल्यांना सामोरं जाण्याची पोलिसांची सदैव तयारी असते. तरीदेखील पोलीस असो वा आपल्या इतर सुरक्षा यंत्रणा हा हल्ला टाळू शकल्या नाहीत.

ब्रेनडेड झालेल्या तरुणाचे अवयवदान ; ५ लोकांना मिळाले नवीन आयुष्य !

जर्मन बेकरीचा हल्ला हा काही साधं सुद्धा हल्ला नसून तो आपली देशावरील दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यानं संपूर्ण सरकारी यंत्रणा देखील जागी झाली. हा हल्ला करणाऱ्या हरामखोरांना सोडणार नाही असे आवाज देशभरातून येऊ लागले. नेहमी शांतेतेत जगणारे पुणेकर हादरून गेले होते.

आज दहा वर्ष उलटूनही त्या किंकाळ्या, ते रक्ताने माखलेले मृतदेह अजूनही डोळ्यासमोरून जात नाहीत काळ्या दिवसाची आठवण पुणेकरांना येत राहते आणि त्या हल्लानंतर पुण्यातल्या प्रसिद्ध जर्मन बेकरीचं नाव एका क्षणात एका वेगळ्याच कारणाने जगभरात पोहोचलं होत.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा