InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पुणे लीग कबड्डी २०१८साठी महिला आणि पुरुष संघांची घोषणा

पुणे । पुणे लीग कबड्डी २०१८ स्पर्धा १९ ते २२ जुलै २०१८ या काळात श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमध्ये पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक संघटनेचे तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते.

या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा कबड्डी संघटनेला संलग्न असणाऱ्या संस्थामधील पुरुष व महिला खेळाडूंची निवड चाचणी रविवार दि. ८ जुलै २०१८ रोजी पार पडली. त्यानंतर आज संघांची घोषणा करण्यात आली.

यामध्ये पुरुषांचे ८ तर महिलांचे ६ संघ करण्यात आले आहेत. प्रत्येक संघात १२ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक संघासोबत एक प्रशिक्षक आणि एक व्यवस्थापक असणार आहे.

पुरुषांचे संघ-
१. बलाढ्य बारामती (कर्णधार- आदम शेख )
२.वेगवान पुणे (कर्णधार- सतिश पाटील)
३. लय भारी पिंपरी चिंचवड (कर्णधार- विनित कालेकर )
४. झुंजार खेड (कर्णधार- प्रविण मुळुक )
५.माय मुळशी (कर्णधार- बबलु गिरी )
६.छावा पुरंदर (कर्णधार- अक्षय बोडके)
७.सिंहगड हवेली (कर्णधार- निखील भस्मारे)
८.शिवनेरी जुन्नर (कर्णधार- सागर तांबोळी )

महिलांचे संघ-
१. बलाढ्य बारामती (कर्णधार- अंजली मुळे )
२.वेगवान पुणे (कर्णधार- सोनाली सकट )
३. लय भारी पिंपरी चिंचवड (कर्णधार- अपूर्वा मुरकुटे )
४. झुंजार खेड (कर्णधार- संजना पवार )
५.माय मुळशी (कर्णधार- पायल वसवे )
६.छावा पुरंदर (कर्णधार- तेजल पाटील )

महत्त्वाच्या बातम्या-

-फिफा विश्वचषक २०१८: पराभवानंतर वार्नर-गंभीरने इंग्लंडला केले ट्रोल

-तिसऱ्या क्रमांकावर आज कोण? कोहली की केएल राहुल?

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply