Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिका (PMC) मध्ये ‘या’ पदांच्या भरती प्रक्रियेसाठी मुदतवाढ, लवकर करा अर्ज
Pune Municipal Corporation | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Pune Municipal Corporation) एकूण 320 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – 08 जागा, वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी- 20 जागा, उपसंचालक – 01 जागा, पशु वैद्यकीय अधिकारी (श्रेणी – 2) – 02 जागा, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक- 20 जागा, आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक (श्रेणी – 3) – 40 जागा, कनिष्ठ अभियंता (विद्युत)- 10 जागा, वाहन निरीक्षक – 03 जागा, मिश्रक / औषध निर्माता – 15 जागा, पशुधन पर्यवेक्षक – 01 जागा, अग्निशामक विमोचक / फायरमन – 200 जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 13 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://ibpsonline.ibps.in/pmcfeb23/
जाहिरात पाहा (View ad)
https://www.pmc.gov.in/recruitment/files/recruitment_advertisement_2023.pdf
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.pmc.gov.in/landing/mar.html
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | ‘या’ इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज
- Job Opportunity | एअर इंडिया एअर सर्विसेस (AIASL) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Blackheads | कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या पद्धती
- Saraswat Bank | सारस्वत बँकेमध्ये ‘या’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Oliy Skin | उन्हाळ्यामध्ये तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
Comments are closed.