Pune Rain | पुण्याला गारपिटीने झोडपलं! ‘या’ भागात जोरदार पाऊससह गारपीट
Pune Rain | पुणे: पुणे शहर आणि परिसरात भर उन्हात पावसाला सुरुवात झाली. दिवसभर कडक उन्हामुळे पुणेकर हैराण झाले होते. अशात पुण्यात आज पुन्हा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. तर कोथरूड परिसरातही गारांसह जोरदार पाऊस बरसला आहे.
पुण्यातील (Pune Rain) कोथरूड परिसरात सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्याचबरोबर वारजे परिसरात वारा आणि पावसासह गारपिटीने हजेरी लावली. जंगली महाराज रोड आणि डेक्कन परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या या पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील बहुतांश ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्रता वाढत चालली असून, काही भागांमध्ये दररोज अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. उष्णता आणि दमट वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. नागरिकांना या उकाड्यापासून लवकरच दिलासा मिळणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यामध्ये 21 एप्रिलपासून ते 28 एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरित कामं लवकरात लवकर उरकून घ्यावी, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Railway Recruitment | उत्तर पश्चिम रेल्वेत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Sharad Pawar | शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात बंद दाराआड दोन तास चर्चा, राजकीय वर्तुळात खळबळ
- Glowing Skin | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी दुधाच्या मलाईचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- BECIL Recruitment | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Rajnath Singh | मोठी बातमी ! संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण
Comments are closed.