InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सायकल,श्रवणयंत्रे ,चप्पल वाटणे खासदाराचे काम नाही, विजय शिवतारे यांची सुप्रिया सुळेंवर टीका

सायकल,श्रवणयंत्रे ,चप्पल ,काठया वाटणे हे काय खासदाराचे काम नाही,  अशी टिका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीचे खासदार सुप्रिया सुळेवर केली. पुण्यातील वैशाली हॉटेल येथील कट्ट्यावर विजय शिवतारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बारामती लोकसभा मतदार संघात लोकांमध्ये असंतोष असून, मोठी उलथापालथ होणार आहे. तसेच याठिकाणी मी प्रचारतही कुठे कमी पडणार नसून, सुप्रिया सुळेंचा पराभव हे सेनेचे ध्येय आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे अपयशी ठरल्या आहेत अशीही टीका त्यांनी केली. 2014 साली झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना केवळ बारामती तालुक्यांमधून लीड मिळाल्याने विजयी झाल्या असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.