‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारचं करणार’; पुण्यात पुन्हा होर्डिंगबाजी सुरू

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने लावण्यात आलेल्या होर्डिंगमुळे पुण्यात होर्डिंग वार सुरू झालेलं दिसलं. भाजपकडून होर्डिंग्सवर फडणवीसांच्या उल्लेख ‘विकासपुरुष आणि पुण्याच्या विकासाचे शिल्पकार’ असा करण्यात आला तर, राष्ट्रवादीकडून अजित पवारांचा उल्लेख ‘लयभारी कारभारी’ असा करण्यात आला होता. आता यात शिवसेनेनंही उडी घेतलीये.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त देखील पुण्याच्या मुख्य चौकांमध्ये होर्डींग्ज लावण्यात आले आहेत. या होर्डींग्जवर ‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारचं करणार’, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सर्वच पक्षांनी पुण्यावर लक्ष केंद्रीत करणं चालू केलं आहे. आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अशी होर्डिंगबाजी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चाललेल्या या होर्डींग वाॅरची चर्चा पुण्यात चांगलीच रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा