पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद?, नाना पटोलेंनी स्वतः दिली गुडन्यूज

पुणे : पुणे हा काँग्रेस विचारांचा जिल्हा आहे, या जिल्ह्यात आजही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. सातत्याने काँग्रेसचा झेंडा या भागात फडकत राहिला आहे आणि यापुढेही तो तसाच फडकत राहील. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढेल त्यादृष्टीने काम करा. पुणे जिल्ह्याबरोबरच २०२४ साली राज्यातही काँग्रेसचा झेंडा पूर्ण ताकदीने फडकेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

तसेच पुढे यावेळी नाना पटोले यांच्या हस्ते पुण्यातील वेल्हे तालुक्यातील विविध विकासकामांचं भूमिपूजन आज करण्यात आलं आहे. त्यावेळी बोलत असताना पुण्यातील आणखी एका मंत्रिपदाबद्दल भाष्य केलं आहे. वेल्ह्यात आमदार संग्राम थोपटे यांच्या निधीतील विकासकामांचं भूमीपुजन करण्यात आलं होत. तसेच संग्राम थोपटे यांच्या मंत्रिपदाबाबत सध्या चर्चा रंगल्या आहेत.

या कार्यक्रमावेळी बोलत असताना नाना पटोले म्हणाले की, ‘तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत, त्यासाठी आता जास्त प्रतिक्षा करावी लागणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मंत्रिमंडळातील जागा भराव्यात अशी आमची इच्छा आहे.’ हायकमांड काय निर्णय घेतंय ते बघूया, असं म्हणत येत्या 4 ते 5 महिन्यात तुमच्या मनातील इच्छा पुर्ण होईल, असं बोलून नाना पटोलेंनी आमदार संग्राम थोपटे यांच्या मंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा