InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

टोईंगद्वारा पुणेकरांची होणार आणखी लूट

- Advertisement -

हेल्मेटसक्तीच्या नावाखाली पुणेकरांची आधीच लूट सुरू असताना नो पार्किंगमधील वाहने टोईंग करण्याच्या कामासाठी नागपूरच्या कंपनीला काम देऊन तिच्यामार्फत पुणेकरांची लूट सुरु केली आहे़.

राज्याच्या विधी व न्याय विभागाकडून नागपूरमधील विदर्भ इन्फोटेक कंपनीला वाहतूक विभागाने गाड्या उचलण्याचे काम दिल्याचा आरोप होत आहे. नो पार्किंगमधील वाहने टोईंगचे कंत्राट तातडीने रद्द करण्याचीही मागणी पुढे आली आहे.

- Advertisement -

दुचाकी वाहने टोईंग करण्याच्या निविदेनुसार २०० रुपये नो पार्किंगचा दंड व टोईंगसाठी ५० रुपये इतका दंड होता़. चारचाकीसाठी२०० रुपये दंड व टोईंगसाठी २५० रुपये इतका दंड होता़. सध्या दुचाकीसाठी ४३६ व चारचाकीसाठी ६७२ रुपये खर्च आहे़.

वाहने टोईंग करण्याच्या निविदेमध्ये ५ वर्षे कामाचा अनुभव नमूद असून या कंपनीला हा अनुभव नाही़. त्यामुळे त्यांचे कंत्राट रद्द करावी, अशी मागणी अरविंद शिंदे यांनी केली आहे़.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.