पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचा पाटबंधारे विभागाला दम

“अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे चूकच असून असा अधिकार पाटबंधारे विभागाला नाही. पुन्हा जर अचानकपणे पाणीपुरवठा बंद केला तर पोलिसांत जावं लागेल”, असा सज्जड दम महापौर मुक्ता टिळक यांनी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना भरला.
पाटबंधारे विभागाने बुधवारी दुपारी अचानकपणे पुण्याला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही आक्रमक होत पाटबंधारे विभागाला जाब विचारण्याची भूमिका घेतली होती. मात्र जलसंपदाविभागाचे मुख्य अभियंता ता.ना. मुंडे आणि पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव चोपडे यांनी स्वतःच महापालिकेत येऊन महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अचानकपणे तोडण्यात येणाऱ्या पाण्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी जाब विचारला.
महत्वाच्या बातम्या –