InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बलात्काऱ्यास ‘शरियत’ प्रमाणे फाशीची शिक्षा द्यावी

- Advertisement -

अवघ्या सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करत, तिची हत्या करणाऱ्या नाजिल या आरोपीला उत्तर प्रदेशमधील रामपुरमध्ये पोलिसांनी अटक केली. रामपूरचे पोलिस अधीक्षक आणि एनकाउंटर स्पेशलिस्ट अजय पाल शर्मा यांनी नाजिलच्या दोन्ही पायांवर गोळ्या मारल्याने पोलिसांना त्याला पकडणे शक्य झाले. माध्यमांवर ही बातमी येताच अजय शर्मा यांच्या या धाडसी कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी देखील शर्मा यांच्या कारवाईचे कौतुक करत फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

महाराष्ट्रातही अशा बलात्काराच्या घटना घडत असतात. खरंतर, बलात्कार करणाऱ्या लिंगपिसाट नराधमांचे लिंगच कापण्याची तरतूद कायद्यात करायला हवी. कायद्याची दहशत असेल तर आणि तरच महिलांसाठी सुरक्षित वातावरण आपल्याला या देशात निर्माण करता येईल. असही त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटल आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.