InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पुणतांब्यातील कृषीकन्येच्या वडिलांना न्यायालयीन कोठडी; आंदोलनही तूर्तास मागे

गेल्या ६ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. मात्र, आज पोलिसांनी बळाचा वापर करत तिन्ही मुलींना रुग्णालयात दाखल केलं. तसंच या मुलींचे वडील आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या चौघांनाही १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे तुर्तास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आश्वासनानंतर या मुलींनी आंदोलन मागे घेतले आहे.

मुलींना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली तेव्हा मुलींच्या वडिलांसह कार्यकर्त्यांनी विरोध केला. पोलिसांनी या प्रकरणी धनंजय जाधव, प्रताप वहाडणे, हेमंत कुलकर्णी आणि गजेंद्र जाधव यांना ताब्यात घेतले होते. त्यांना कोर्टाने १८ फेब्रुवारीपर्यंत या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने या मुलींनी गेल्या ६ दिवसांपासून अन्नदान आंदोलन केले होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या , पिकाला हमीभाव द्या अशा त्यांच्या मागण्या होत्या. पण अखेर आज पोलिसांनी बाळाचा वापर करून या मुलींचे आंदोलन मोडून काढले. तसेच एवढे होऊनसुद्धा सरकारने अद्यापही या गोष्टीची दाखल घेतलेली नाही.

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.