InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मराठा सेवा संघ आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार – पुरुषोत्तम खेडेकर

मराठा समाजामध्ये सरकार भांडणे लावत आहे. हे थांबले नाही तर, प्रश्न मार्गी लागणार नाही. आंदोलने थांबवा. मराठा समाजाच्या ५२ टक्के ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीचे मराठा सेवा संघ मुख्यमंत्र्यांना पंधरा दिवसामध्ये निवेदन देणार असल्याचे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितले.

कुर्डुवाडी येथे मराठा सेवा संघाच्या जनसंवाद दौऱ्यानिमित्त मेळाव्यात ते बोलत होते. माढा तालुक्यात झालेल्या आंदोलनामध्ये तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत अशांची मोफत केस लढविणारे अॅड. शशिकांत जगताप यांना पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी जिजाऊ सृष्टीसाठी डॉ. अमोल माने यांनी २५ हजाराचा चेक, राजू व्यवहारे यांनी ११०० रुपये रोख दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply