InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आता महाराष्ट्रात लढायचं कुणाबरोबर, हाच माझ्यापुढे मोठा प्रश्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादीला मोठा धक्का देत त्यांच्या पक्षातील नेत्यांना भाजपात प्रवेश दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दोन्हींही पक्षावर बोचऱ्या टिका करण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्रात आता लढायचं कुणाबरोबर हाच माझ्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, असा सवाल त्यांनी गुरूवारी सकाळी येथे मंगळवेढा येथे झालेल्या जाहीरसभेत उपस्थित केला.

Related Posts

शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- नरेंद्र मोदी

Loading...

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात भाजप सरकारने एकही भ्रष्ट्राचार न करता पारदर्शक कारभार केला आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्याबरोबरच शासनाच्या योजनांच्या माध्यमातून गोरगरीबांना न्याय देण्याचे काम भाजप सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभानिवडणूकीत विरोधकांचे म्हणावे तेवढे आमदार निवडून येतील का नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मागील दोन दिवसांपुर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच विलीनीकरण होणार असल्याचे संकेत दिले, हे संकेत नसून विरोधी पक्षात बसण्यासाठीची धडपड सुरू आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.