InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

KBC मध्ये विचारला मोदी सरकारशी संबंधित प्रश्न

- Advertisement -

सोनी टीव्हीवरील शो कौन बनेगा करोडपतीला सध्या प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत 2 स्पर्धक करोडपती झाले आहेत. पण या शोमध्ये जनरल नॉलेजसोबतच मोदी सरकारशी संबंधितही काही प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान या शोमध्ये एका अशा स्पर्धकानं हजेरी लावली, जो पंतप्रधान मोदींचा खूप मोठा चाहता आहे आणि याचा खुलासा त्यानं केबीसीमध्ये केला.

केबीसीच्या 11 व्या सीझनमध्ये गुरुवारी झालेल्या एपिसोडमध्ये मूळ बिहारचा पण सध्या पंजाबमध्ये राहत असलेल्या अभिषेक झा ला अमिताभ बच्चन यांनी मोदी सरकारशी संबंधित प्रश्न विचारला. अभिषेकला विचारण्यात आलं, मे 2019 मध्ये स्थापन झालेल्या नव्या कॅबिनेट मंंत्रालयातील असे एकमेव मंत्री कोण आहेत. ज्यांचा जन्म भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी झाला आहे. अभिषेकनं या प्रश्नचं अचूक उत्तर दिलं होतं. याचं उत्तर होतं, राम विलास पासवान.

Loading...
Related Posts

लहान मुलाबरोबर कुस्ती खेळल्यावर पैशांऐवजी रेवड्या मिळतात, शरद…

- Advertisement -

राम विलास पासवान यांचा जन्म भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या एक वर्ष अगोदर म्हणजे 5 जुलै 1946 ला बिहारच्या खगरिया या गावात झाला. आता ते 73 वर्षांचे आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 ला गुजरातच्या वडनगरमध्ये झाला. पंतप्रधान मोदी आता 69 वर्षांचे आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.