कोंबडी अंडी देईना, कंपनी भरपाई देईना, रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोच्या कारभारावर प्रश्न उपस्थित

मुंबई : गेले कित्येक दिवस संपूर्ण जग कोरोना या भयानक महामारीचा सामना करत आहे. आपल्या देशालाही याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या काळात शेतकऱ्यांचे तसेच शेतीशी निगडीत अनेक व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत ना राज्य सरकारकडून दिली जात आहे ना केंद्र सरकार कडून ठोस मदत दिली जात आहे. याआधी मागील काही काळात बर्ड फ्लुचा फैलाव झाला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना तसेच पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला होता.

यावर पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं थेट फेसबुक लाईव्ह करतबारामती अ‍ॅग्रोवर गंभीर आरोप केले आहेत. बारामती अ‍ॅग्रो कंपनीचं उत्पादन खराब झाल्यानं आणि कंपनीने विक्रीपुर्वी क्वालिटी चेक न केल्यानं पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे, असा आरोप योगेश चौरे या शेतकऱ्यानं केला आहे. तालुक्यात अनेक भागात पोल्ट्री व्यवसायिकांनी बारामती अॅग्रो कंपनीचं फीड खरेदी केलं होतं. मात्र हे फीड कोंबड्यांना दिल्यानंतर कोंबड्यांनी अंडी देणं बंद केलं आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना महिन्याला 3 लाखांचं नुकसान होत असल्याचं शेतकऱ्यानं सांगितलं आहे.

याशिवाय त्यांनी आणखी एक पोस्ट करून पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्याचं नुकसान झालं तर पवार साहेब बांधावर जावुन पाहणी करतात. नवं पर्व शेतकऱ्याला एसीमधे पण मीटींग द्यायला तयार नाही असे त्यांनी म्हटले आहे. तर पुढे आमच्याशी चर्चा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील या शेतकऱ्याने केली आहे.

यानंतर या सर्व प्रकरणामुळे आ. रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोच्या कारभारावर प्रश्न उपस्थित राहु लागले आहे. चौरे यांच्या बोलण्यातून पोल्ट्री व्यावसायिकांची जराशीही दखल न घेणाऱ्या या कंपनीसोबत व्यवसाय करणे किती महागात पडू शकते याची प्रचीती येत असल्याचे दिसून येत आहे. कोंबडी अंडी देईना, कंपनी भरपाई देईना अशी काहीशी अवस्था या व्यावसायिकांची झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा