R Ashwin | ‘ही’ कामगिरी करणारा रविचंद्रन अश्विन ठरला जगातील दुसराच खेळाडू

R Ashwin | ढाका: भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये रविचंद्रन अश्विन (R Ashwin) ने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघ जेतेपदापर्यंत पोहोचला होता. भारताने ही मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली. या सामन्यामध्ये अश्विनने 42 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले होते. या खेळीनंतर अश्विनने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 3000 धावा पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर या सामन्यामध्ये त्याने आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला आहे.

बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये अश्विनने 62 चेंडू मध्ये 42 नाबाद धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 1 षटकार आणि 4 चौकार मारले. आठव्या विकेटसाठी श्रेयस अय्यर आणि अश्विनने नाबाद 71 धावांची भागीदारी केली होती. या दोघांच्या खेळीमुळे भारतीय संघ विजयापर्यंत पोहोचला होता. या सामन्यामध्ये अश्विनने आपल्या कसोटी कारगर्दीतील 3000 धावा पूर्ण केल्या.

अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये तीन हजार धावा आणि चारशे बळी घेणारा जगातील दुसरा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. त्याने 88 कसोटी सामन्यांमध्ये 3000 धावा पूर्ण केले आहेत. तर, 88 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 449 विकेट घेतले आहे. अश्विनच्या आधी रिचर्ड हॅडली याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा आणि 400 बळींचा टप्पा गाठला होता. त्याने तब्बल 87 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.

बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेमध्ये अश्विन सोबत ऋषभ पंतने देखील चांगली कामगिरी केली होती. मात्र, आत्तापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये ऋषभ पंतने टी-20 फॉर्मेट मध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. त्यामुळे विश्वचषकातील अपयशानंतर बीसीसीआयने काही कठोर निर्णय घेण्याचे ठरवले आहे. दरम्यान, ऋषभ पंतला संघातून बाहेरचा रस्ता दाखवल्या जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.