InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शरद पवारांनी वडिलांबद्दल केलेलं विधान हे अत्यंत चूकीचं – राधाकृष्ण विखे – पाटील

मुलगा सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ”शरद पवारांनी वडिलांबद्दल केलेलं विधान हे अत्यंत चूकीचं होतं. त्यांनी केलेल्या विधानामुळे मी दुखावलो गेलो आहे,” असं ते म्हणाले.

सुजयने घेतलेल्या निर्णयानंतर मी पक्षश्रेष्ठींना भेटून माझी भूमीका स्पष्ट केली. आघाडीचा धर्म पाळण्याचा मी अटोकाट प्रयत्न केले, पण नगरमध्ये मी आता सुजय विरुद्ध आघाडीचा प्रचार करणार नाही,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

तर, सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर आता आपण राजीनामा देणार का? या प्रश्नावर बोलताना ”पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील” असं ते म्हणाले.

काँग्रेसनं राष्ट्रवादीकडे नगरची जागा मागितली होती. कारण, जास्त जागा जिंकाव्यात हेच यामागील गणित होतं, आम्ही आघाडीची धर्म पाळण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलासाठी हा सर्व संघर्ष उभा राहिलाय, असं म्हणणं चुकीचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.