Radhakrishna Vikhe Patil | “उद्धव ठाकरे फक्त फेसबुकवरचे मुख्यमंत्री होते”; राधाकृष्ण विखे पाटलांची जहरी टीका

Uddhav Thackeray | सोलापूर : राज्यात 8 महिन्यापूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला होता. शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत 40 आमदारांना सोबत नेलं आणि शिवसेनेत मोठी फूट पडली. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर आपला हक्क दाखवला. शिवसेना पक्ष आणि चिन्हही एकनाथ शिंदे गटाकडे गेल्यानंतर ठाकरे गट आणि शिवसेनेचे वाद आणखी वाढले आहेत. यानंतर ठाकरे गटाकडून वारंवार शिवसेनेसह भाजपवरही जोरदार निशाणा साधला जातो आहे. करमाळा येथील स्वर्गीय माजी मंत्री दिगंबरराव बागल कृषी महोत्सवावेळी बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

“उद्धव ठाकरे फक्त फेसबुकवरचे मुख्यमंत्री होते”

“उद्धव ठाकरे हे फक्त अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते, मात्र ते फक्त फेसबुकवरचचे मुख्यमंत्री होते. या काळात उद्धव ठाकरेंकडून फेसबुकवर काय सांगितले जात होते, ‘माझे कुटुंब तुमची जबाबदारी’ आणि हे मात्र घरात बसायचे. तर यांची जबाबदारी आपण घ्यायची आणि लोक वाऱ्यावर सोडायची”, अशी खरपूस टीकाही यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.