Radhakrishna Vikhe Patil | “उद्धव ठाकरे हे संधीसाधू, ते स्वत: भाजपच्या मदतीने निवडून आले”; विखे पाटलांची टीका
Radhakrishna Vikhe Patil | अहमदनगर : भाजपमध्ये पूर्वी साधू होते, आता संधीसाधू आहेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी रविवारी खेड येथे झालेल्या सभेत केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
“खरे संधीसाधू उद्धव ठाकरे आहेत. ते स्वत: भाजपच्या मदतीने निवडून आले आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कळपात जाऊन बसलात. एवढच नाही तर आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी आमदार केलं. तेव्हा त्यांना शिवसैनिक आठवला नाही का? तेव्हा त्यांनी एका शिवसैनिकाला संधी द्यायला पाहिजे होती. ही संधी देण्याचं धारिष्ठ त्यांनी दाखवलं नाही. त्यामुळे मी म्हणजे शिवसैनिक, मी म्हणजे शिवसेना, हे सांगणं आता त्यांना बंद करावा, त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे.
Radhakrishna Vikhe Patil Criticize Uddhav Thackeray
“निर्णय तुमच्या बाजूने लागला असता, तर हाच निवडणूक आयोग तुमच्यासाठी चांगला असता, पण तुमच्या विरोधात निकाल लागल्याने तुम्ही आयोगाला पक्षपाती म्हणता, लोकशाही प्रक्रियेत निवडणूक आयोगाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. ती एक स्वायत्त संस्था आहे. तिचा सन्मान करायला शिका”, असा सल्ला राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Bacchu Kadu | “आम्हालाही मुख्यमंत्री व्हायचंय”; बच्चू कडूंनी जाहीर सभेत बोलून दाखवली इच्छा
- Gulabrao Patil | “बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील आहेत मान्यय पण…”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर गुलाबरांचं वक्तव्य
- Yogesh Kadam | “बाळासाहेब ठाकरेंना ‘७५ वर्षांचा म्हातारा’ म्हणणाऱ्याला सुषमा अंधारेंना तुम्ही…”- योगेश कदम
- Sharad Pawar | “बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर…”; पवारांनी सांगितलं भाजपच्या पराभवाचं कारण
- Uddhav Thackeray | “भाजपला गल्लीतलं कुत्र विचारत नाही”; उध्दव ठाकरेंची भाजपवर बोचरी टीका
Comments are closed.