Radhakrishna Vikhe Patil । सातारा : नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूक निकालानंतर राज्यात विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यातील या घडामोडींबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना टोला लगावला आहे.
विखे पाटलांची बाळासाहेब थोरातांवर टीका (Radhakrishna Vikhe Patil criticized Balasaheb Thorat)
“मी ज्यावेळी काँग्रेस सोडून गेलो त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी भीम गर्जना केली होती, एकटा खिंड लढवणार, ते आता खिंड सोडून कोणत्या दिशेला पळून जाणार आहेत हे त्यांनाच माहिती”, अशी बोचरी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली आहे.
बाळासाहेब थाेरात यांनी भाजप पक्षात प्रवेश केला तर तुम्ही स्विकारणार का? या प्रश्नावर विखे पाटील म्हणाले माझा काही संबंध येत नाही. बाळासाहेब थोरात भाजपामध्ये आलेच तर माझा विरोध असायचा कारण नाही, त्याबाबत पक्षनेतृत्व निर्णय घेईल, त्या निर्णयाला अधीन राहून आम्ही काम करू.
त्याचबरोबर नाशिक पदवीधर मतदारसंघात महविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार होता आणि काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. पण काँग्रेसने महविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी का प्रयत्न केला नाही?, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी बाळासाहेब थोरात यांना एकटे खिंड लढविलेले बाजीप्रभू म्हटले गेले होते. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ४४ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचे दिल्लीच्या वर्तुळातील राजकीय वजन वाढले होते. महाविकास आघाडी स्थापन करण्यात त्यांची मोठी भूमिका राहिली. हे अन्य काँग्रेस नेत्यांना असुरक्षित वाटले. त्यामुळे थोरात विरोधी गटाकडून आता सत्यजित तांबे यांच्या निमित्ताने त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nana Patole | “मला शक्तीशाली समजल्याबद्दल…”; राऊतांच्या टीकेला नाना पटोलेंचं सडोतोड उत्तर
- Congress | “कोण रोहित पवार? मला माहिती नाहीत”; काँग्रेसच्या ‘या’ महिला आमदाराची खोचक टीका
- Valentine Day | जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी ‘ही’ ठिकाणं ठरू शकतात सर्वोत्तम
- Ashok Gehlot | मुख्यमंत्र्यांनी वाचला जुनाच अर्थसंकल्प; सभागृहात उडाला मोठा गोंधळ
- Nana Patole | “ते मुंबईत येत असतील तर…”; अदाणी प्रकरणावरून नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल