Radhakrishna Vikhe Patil । “उद्धव ठाकरेंचे प्रेम बेगडी”; विखे पाटलांची सडकून टीका

Radhakrishna Vikhe Patil । मुंबई :  परतीच्या पावसामुळे मराठावाडा येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याची पाहणी करण्यासाठी रविवारी माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मराठवाडा म्हणजेच औरंगाबाद दौऱ्यावर होते. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. या दौऱ्यावरुन सत्ताधारकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. उध्दव ठाकरे यांचा पाहणी दौरा म्हणजे केवळ फार्स असून,अडीच वर्ष घरात बसले तेच आता शेतकऱ्यांविषयी बेगडी प्रेम दाखवायला निघाले असल्याचा खोचक टोला महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी लगावला.

विखे पाटील म्हणाले, की अडीच वर्ष घरात बसून माझे कुटुंब तुमची जबाबदारी म्हणून ज्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले होते. तेच आज पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जात असल्याचे आश्चर्य वाटत आहे. कोविड संकटात राज्यातील शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. बाजार समित्या बंद ठेवल्या. शेतकऱ्यांना आपला माल फेकून द्यावा लागला तरी मागील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कवडीची मदत केली नाही. ते आता शेतकऱ्यांना काय देणार? असा सवाल करत विखे पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी विषयक निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचं विखे पाटील यावेळी बोलताना म्हणाले. “कोरोना काळात मोफत लसीकरणापासून धान्य देण्यापर्यंत हे सर्व कामे पंतप्रधान मोदी यांना करावी लागला. त्यावेळी राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा नव्हता, त्यातही केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला. त्याकाळात कृषी उत्पन्न बाजार समिती, आडते बंद ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांना अखेर कवडीमोल भावात माल विकावा लागला होता. शेतकऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडले होते. त्यामुळे तुम्ही आता कितीही दौरे केले, तरी काहीही फरक पडणार नाही, कारण शेतकऱ्यांनी तुमचे खरे रुप ओळखले आहे”, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.