‘क्ले कोर्ट’चा बादशाह राफेल नदाल विवाहबंधनात

टेनिसच्या विश्वात आपल्या दमदार खेळाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा आणि क्ले कोर्टचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेल नदाल याच्या जीवनात एक नवं वळण आलं आहे. जवळपास १४ वर्षांपासूनची पार्टनर, प्रेयसी सिस्का पेरेलो हिच्यासोबत राफेल नदाल विवाहबंधनात अडकला आहे.

स्पेनमधील Mallorca येथील एका कॅसलमध्ये त्यांनी आयुष्यभरासाठी एकमेकांना साथ देण्याची वचनं दिली. या अत्यंत खासगी स्परुपात पार पडलेल्या विवाहसोहळ्याला मोजक्याच मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली होती.

नदालचा प्रतिस्पर्धी आणि तितकाच चांगला मित्र, विश्वविख्यात टेनिसपटू रॉजर फेडरर आगामी स्पर्धेच्या तयारीत असल्यामुळे  त्याची या विवाहसेहळ्यात अनुपस्थिती पाहायला मिळाली. जवळपास ३५० पाहुण्यांच्या उपस्थितीत राफेल आणि सिस्का विवाहबंधनात अडकले. यावेळी टेनिसपटू फॅलिन्सिएनो लोपेज, डेव्हिड फेरर, ज्युआन मोनाको यांनी हजेरी लावली होती.

अशी झाली होती त्यांची भेट….

टेनिस जगतात दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या नदालची पत्नी, ३१ वर्षीय सिस्का हीने बिझनेस क्षेत्रातील पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. इन्शुरन्समधील नोकरी सोडत तिने राफेल नदाल फाऊंडेशनमध्ये संचालकपदाचा पदभार सांभाळला. नदाल आणि सिस्का यांची भेट ही त्याच्या लहान बहिण मॅरिबेलमुळे झाली होती. नदालही बहीण आणि सिस्का या दोघीही बालपणीच्या मैत्रीणी असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.