InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राफेल, सुखोई लढाऊ विमाने पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरेल- एअर मार्शल राकेशकुमार सिंह

- Advertisement -

भारतीय हवाई दलाची राफेल आणि सुखोई लढाऊ विमाने ही तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तानसाठीच नव्हे तर इतर कुठल्याही देशांसाठी डोकेदुखी ठरतील असे, हवाई दलाचे एअर मार्शल राकेशकुमार सिंह भदोरिया यांनी म्हटले आहे.

एअर मार्शल भदोरिया यांनी फ्रान्समधील पॅरिसमध्ये राफेल विमानांतून आकाशात भरारी घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘भारतात येणारी राफेल लढाऊ विमाने आपल्या संरक्षणविषयक रणनीतीसाठी खूपच महत्वाची ठरणार आहेत. एकदा का ही विमाने हवाई दलाच्या सेवेत दाखल झाली की राफेल आणि सुखोई यांची जोडी शत्रूसाठी खतरनाक ठरतील.’

- Advertisement -

भदोरिया पुढे म्हणाले, राफेलमधून उड्डाण करणे हा खूपच सुखद अनुभव होता. याद्वारे आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. या अनुभवानंतर आम्ही हे तपासणार आहोत की, आपल्या लढाऊ विमानांच्या ताफ्यातील सुखोई-३० सोबत राफेल किती फायदेशीर ठरेल.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.