Rahul Dravid | राहुल द्रविडनंतर ‘हा’ माजी खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा प्रशिक्षक

Rahul Dravid | टीम महाराष्ट्र देशा: राहुल द्रविड (Rahul Dravid) सध्या टीम इंडियाचे हेड कोच आहेत. राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोण असणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत सध्या एक मोठी माहिती मिळाली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा करार संपणार आहे. त्या आधीच बीसीसीआयने टीम इंडियासाठी नवा प्रशिक्षक शोधत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार राहुल द्रविडनंतर व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदवी विराजमान होऊ शकतो. आयर्लंड, इंग्लंड आणि झिंबाब्वे दौऱ्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियासोबत होता. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकादरम्यान राहुल द्रविड कोविड पॉझिटिव्ह असताना लक्ष्मण टीम इंडियासोबत होता. त्यानंतर न्युझीलँड दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचे हेड कोच म्हणून काम केले होते.

नॅशनल क्रिकेट ॲकॅडमीमध्ये खेळाडूंना तयार करण्यामध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा वाटा असतो. त्याचबरोबर अंडर नाईन्टीन वर्ल्डकपसाठी लक्ष्मण भारतीय संघासोबत होते. त्याचबरोबर वेस्टइंडीजमध्ये युवा टीम सोबत त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय राहुल द्रविडच्या जागी पर्याय शोधत आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की,”आम्ही विविध प्रकारचे पर्याय शोधत आहोत. सध्या आम्ही घरच्या मैदानावर होणाऱ्या एक दिवसीय विश्वचषकासाठी तयारी करत आहोत. कारण आपल्याला तो विश्वचषक जिंकायचा आहे. या कारणांमुळे टी-20 वर दुर्लक्ष होणार आहे. त्यामुळे टी-20 कोचमध्ये बदल केला जाऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या