Rahul Gandhi | “तुम्हाला बॉम्बने…” ; राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी

Rahul Gandhi | मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर येतेय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात पत्र पाठवत राहुल गांधींना धमकी देण्यात आली आहे. यामध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवू असं धमकावण्यात आलं आहे. पोलीस आणि क्राइम ब्रांच हे निनावी पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत असल्याची माहिती समोर येतेय.

सूत्रांच्या माहितीनुसार, इंदोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात धमकीचे पत्र मिळाले आहे. सध्या पोलिस शेजारी लावलेल्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे पत्र सोडून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या महाराष्ट्रात असून २४ नोव्हेंबरला इंदोरमध्ये असणार आहेत. खालसा स्टेडिअममध्ये ते रात्री विश्रांतीसाठी थांबणार आहेत.

“नोव्हेंबर २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण इंदूर बॉम्बस्फोटांनी हादरून जाईल. असं या पत्रात लिलीलेलं आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इंदूरमध्ये विविध ठिकाणी भीषण बॉम्बस्फोट होणार. राहुल गांधींनाही राजीव गांधींकडे पाठवण्यात येणार आहे”, अशा आशयाचं हे पत्र आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.