Rahul Gandhi | “भारत जोडो यात्रा रोखूनच दाखवा”, राहुल गांधींचं खुलं आव्हान

Rahul Gandhi | मुंबई : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) रोखण्यासाठी भाजप (BJP) पक्षाकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप आहे. अशातच अकोला येथे राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावर आज राहुल गांधी यांनी पक्षाला खुलं आव्हान दिलं आहे.

यादरम्यान, भारत जोड़ो यात्रा महाराष्ट्रातच रोखण्याच्या भाजप नेत्यांच्या मागणीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी प्रथमच मीडियासमोर आले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला खासदार शेवाळे यांचे विचार चुकीचे आहेत असं नाही, ते त्यांच वैयक्तिक विचार आहेत. जर सरकारला यात्रेमुळे देशाचे नुकसान होत आहे अस वाटत असेल तर यात्रा रोखून दाखवा, असं आव्हान त्यांनी दिलं आहे.

यावेळी, ढे ते म्हणाले की, लोकांना भारत जोडो यात्रेची गरज नाही, असं वाटत असतं तर हजारों लोक यात्रेत सहभागी झाले नसते, सत्ताधाऱ्यांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे. शिक्षणासाठी वैद्यकीय उपचारासाठी पैसे द्यावे लागतात. सरकारी शाळा, दवाखाने बंद होत आहेत. महाराष्ट्रात तर २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत. महागाई तर वाढत आहे. मग देशातील पैसे कोठे जात आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहेत, ते पैसे कोठे, कोणाच्या हातात जात आहेत, असा सवाल राहुल गांधींनी उपस्थीत केला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.