Rahul Gandhi | राहुल गांधींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं भरभरून कौतुक; म्हणाले, “मी माझं संपूर्ण आयुष्य…”

Rahul Gandhi | शेगाव : काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात चालू झालेली भारत जोडो यात्रा  महाराष्ट्रात आहे. भारत जोडो यात्रेच्या शेगावमधील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) तोंडभरून कौतुक केलं आहे. राष्ट्रमाता जिजाऊ असा उल्लेख करत जिजाऊंनीच शिवाजी महाराजांना मार्ग दाखवला, असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं.

राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, “शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला मार्ग दाखवला. ही त्या शिवाजी महाराजांची भूमी आहे. आई मुलाला मार्ग दाखवते. शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज कोणी बनवलं? ते शिवाजी महाराज कसे झाले? हे शिवाजी महाराज नेमके काय होते? हो, ते एक व्यक्ती होते. मात्र, ते केवळ एक व्यक्ती नव्हते. त्यांच्यात आणि आपल्यात एक फरक आहे. तो फरक म्हणजे ते महाराष्ट्राचा आवाज होते.”

तसेच मी माझं संपूर्ण आयुष्य हे विसरणार नाही की, महाराष्ट्राच्या जनतेने मला इतकं प्रेम दिलं, इतकी शक्ती दिली आणि इतकं ज्ञान दिलं, असंही ते म्हणाले. “जनतेच्या मनातील सर्व भावना शिवाजी महाराजांच्या मनात होत्या. त्यांना मार्ग दाखवण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केलं. आज आम्ही त्यांचंही स्मरण करतो. जे शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांनी म्हटलं तेच काम ही भारत जोडो यात्रा करत आहे”, असंही राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, सत्य साई बाबा या महापुरुषांची यादी आहे. हे सर्व महापुरुष या भूमीत होऊन गेले. यापैकी कुणी सांगितलं का की, हिंसा पसरवा, भीती दाखवा. नाही ना. पण, भाजप तोडण्याचं काम करते. आम्ही जोडण्याचं काम करतो, असंही राहुल गांधी यांनी म्हंटलं.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.