Rahul Gandhi | राहुल गांधींच्या ‘त्या’ भाषणावरुन संसदेत मोठा गदारोळ; काही काळ कामकाज तहकूब
Rahul Gandhi | नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 6 एप्रिलपर्यंत चालणार असून यादरम्यान 17 बैठका होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच संसदेमध्ये आज मोठा गदारोळ पहायला मिळाला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ब्रिटनमधील भाषणावरुन भाजपने त्यांच्यावर आगपाखड केली आहे.
भाजपने आज संसदेत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ब्रिटनमधील भाषणावर हल्ला चढवला. जिथं ते म्हणाले की, देशाची लोकशाही ‘पूर्ववत झाली आहे’. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि माजी काँग्रेस अध्यक्षांना माफी मागण्यास सांगितले.
संसदेत मोठा गदारोळ
राहुल गांधांवर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे संसदेत मोठा गोंधळ सुरु झाला. या गोंधळानंतर लोकसभा-राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतील भाजप नेते पियुष गोयल (Piyush Goyal) यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
Piyush Goyal Criticize Rahul Gandhi
“राहुल गांधींनी परदेशी भूमीवर भारतातील जनतेचा आणि सदनाचा अपमान केला आहे. भारतात भाषण स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकजण संसदेत आपले विचार मांडत असतो. त्यांना भारताबाबत अशी टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. त्यांनी माफी मागावी” अशी मागणी पियुष गोयल यांनी लावून धरली आहे.
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी मंत्र्यांची बैठक घेतली. दुसरीकडं, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांची रणनीती आखण्यासाठी इतर विरोधी पक्षांसोबत विचारमंथन केले असल्याचीही माहिती मिळत आहे.
- Eknath Shinde | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
- MNS Dilip Dhotre | संत चोखामेळा मंदिराचे काम आठ दिवसात सुरु न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा…
- MNS – Dilip Dhotre | संत चोखामेळा मंदिराचे काम आठ दिवसात सुरु न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा…
- NCP Leader | राष्ट्रवादीच्या बड्या नेत्या सह तिघांच्या विरोधात सोलापुरात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…
- International Film Festival – चंद्रपुरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल; तीन दिवसांत देशी-विदेशी चित्रपटांची पर्वणी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.