Rahul Gandhi | “राहुल गांधींच्या वक्तव्याचा खरा धोका…”, ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा इशारा
Rahul Gandhi | मुंबई : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. अशातच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात वातावरण तापलं आहे. यावरुन मनसे (MNS) नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी घणाघात केला आहे.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र वीर सावरकरांबाबतचं वक्तव्य त्यांनी महाराष्ट्रातच का केलं? कारण महाराष्ट्राची अस्मिता मी किती पायदळी तुडवू शकतो, हे त्यांना दाखवून द्यायचंय, असं वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि सहन करणार नाही. खरं तर राहुल गांधींच्या या वक्तव्याचा खरा धोका त्यांच्यासोबत यात्रेत फिरणाऱ्या इथल्या काँग्रेस नेत्यांनाच आहे, असा इशाराही महाजन यांनी दिला.
मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी ठाणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बईहून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ठाणे, भिवंडी, नाशिक असा प्रवास करत ते शेगावला पोहोचणार आहेत. तसेच काँग्रेसला चोख उत्तर देणार असल्याचा इशारा देखील संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना चाप लावणं गरजेचं आहे. आमच्या अविनाश यांनी अनेक मोठ्या भाईंची भाईगिरी उतरवली आहे, आता पप्पूंची पप्पूगिरी उतरवण्यासाठी जात आहोत, असं देशपांडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | वीर सावरकर हे भाजप आणि संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते – संजय राऊत
- Govinda Naam Mera | ‘या’ दिवशी OTT वर रिलीज होणार विकी कौशल्यचा ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपट
- Sachin Sawant । “सत्य कटू असलं तरी ते सत्यच असतं…”; राऊतांच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेसचा पलटवार
- Sanjay Raut | सावरकर वाद पेटला! महाविकास आघाडीत पडणार फुट?, संजय राऊतांचा राहुल गांधींवर घणाघात
- Karan Johar | निपोटिझमच्या चर्चेला उधाण, ‘या’ स्टारकिडला करण जोहर देणार बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.