Rahul Gandhi | राहुल गांधींना सावरकरांविरुद्ध बोलणं भोवणार? ठाण्यात शिंदे गटाकडून अटकेची मागणी

Rahul Gandhi | मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रातील अकोला (Akola) जिल्ह्यात आहे. राहुल गांधी यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी (Rahul Gandhi) ठाम राहीले. त्यामुळे राज्यात सावरकर वाद पेटलेला दिसत आहे. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध संपूर्ण राज्यात केला जात आहे. या वक्तव्याचा निषेधार्थ ठाण्यात काल गुरुवारी ठाण्यातील बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले होते.

बाळासाहेबांची शिवसेनेकडून राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, शिंदेगताच्या महिला आघाडी प्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी ठाण्यातील ठाणे नगर पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.