Rahul Gandhi | “राहुल गांधी मुलं जन्माला घालू शकत नाहीत म्हणूनच अविवाहित”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Rahul Gandhi | बंगळुरू : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका करताना विरोधकांनी त्यांच्या अविवाहित असण्यावरुन अनेकदा टीका केली आहे. राहुल गांधी विदेशातून भाजपवर सडकून टीका करताना दिसत आहे. यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता कर्नाटकमधील एका भाजप नेत्याने राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Nalin Kumar Kateel Criticize Rahul Gandhi

रामनगरा येथे रविवारी भाजपच्या ‘जन संकल्प यात्रे’त नीलम कुमार कतिल बोलत होते. “राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांनी लोकांना कोरोनाची लस न घेण्याचं आवाहन केलं होतं. लस घेतल्याने मुलं होणार नाहीत. अपंगत्व येऊ शकतं, असं सांगत होते. राहुल गांधी मुलं जन्माला घालू शकत नसल्यानेच राहुल गांधी अविवाहित राहिले” अशी टीका नीलम कुमार कतिल यांनी केली आहे.

यावेळी राहुल गांधींवर टीका करताना नीलम कुमार कतिल यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरही टीका केली आहे. नीलम कुमार कतिल यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी कतिल यांच्या  टीकेवर भाष्य केले आहे.

रणदीप सुरजेवाल यांचं प्रत्युत्तर

“कर्नाटक ‘भाजपच्या सर्कसमधील जोकर’ शाब्दिक जुलाबाने त्रस्त आहेत. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने चर्चेत राहण्यासाठी अशी विधान करतात. त्यांना गांभीर्याने घेऊ नये,”, असे रणदीप सुरजेवाल म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-