Rahul Gandhi | सावरकरांचे नातू रणजीत सावरकर आक्रमक! राहुल गांधींविरोधात घेणार पत्रकार परिषद
Rahul Gandhi | मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. अशातच सावरकरांचे नातू रणजीत सावरकर (Ranjeet savarkar) यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे.
रणजीत सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याचं घोषित केलं आहे. त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष आता रणजीत काय बोलणारं याकडे लागलं आहे.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र वीर सावरकरांबाबतचं वक्तव्य त्यांनी महाराष्ट्रातच का केलं? कारण महाराष्ट्राची अस्मिता मी किती पायदळी तुडवू शकतो, हे त्यांना दाखवून द्यायचंय, असं वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि सहन करणार नाही. खरं तर राहुल गांधींच्या या वक्तव्याचा खरा धोका त्यांच्यासोबत यात्रेत फिरणाऱ्या इथल्या काँग्रेस नेत्यांनाच आहे, असा इशाराही महाजन यांनी दिला.
अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे.
राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध संपूर्ण राज्यात केला जात आहे. या वक्तव्याचा निषेधार्थ ठाण्यात काल गुरुवारी ठाण्यातील बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले होते. बाळासाहेबांची शिवसेनेकडून राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Congress | महाविकास आघाडीत काँग्रेस-शिवसेनेत सावरकरांवरुन मतभेद! काँग्रेसने दिलं स्पष्टीकरण
- Devendra Fadnavis | “…तर कारवाई करु” ; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना इशारा
- T20 World Cup | टी 20 वर्ल्ड कप फायनल हरल्यानंतरही पाकिस्तान संघाच्या खेळाडूंना मिळाले करोडो रुपयांचे बक्षीस
- MNS | पप्पू हाय हाय, राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा देत मनसेचं आंदोलन
- MNS | मनसे आक्रमक! राहुल गांधींची सभा उधळण्यास गेलेल्या मनसे नेत्यांना रोखलं
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.