InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत घेण्यात आला आक्षेप, 22 एप्रिलला उमेदवारी अर्जावर फैसला

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज केरळमधील वायनाडबरोबरच उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून भरला आहे. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेला शनिवारी सकाळी सुरुवात झाली.  मात्र अपक्ष उमेदवार असलेल्या धृवलाल यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

तक्रारदारांनी म्हटले आहे की, २००४ मधील उमेदवारी अर्जात राहुल गांधींनी बॅक ऑफ्स लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केल्याचे म्हटले होते. या कंपनीची कागदपत्रे ब्रिटनमध्ये सादर करण्यात आली होती. यात राहुल गांधी हे ब्रिटन नागरिक असल्याचे म्हटले होते. भारताचे नागरिकत्व नसल्यास निवडणूक लढवता येत नाही,  त्यामुळे राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा,  असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

आता यासंदर्भात २२ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply