InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नरेंद्र मोदी माझ्या परिवाराविषयी तिरस्काराने बोलतात, मी त्यांना झप्पी देतो – राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. राजीव गांधी यांचे नाव वापरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर निशाणा साधत आहेत. यावर आता राहुल गांधी यांनी उत्तर दिले असून, मोदींच्या मनात द्वेष, मी मात्र त्यांना झप्पी दिली, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या मनात द्वेष आहे, राग आहे. आमचं काम तो द्वेष कमी करणे आहे.  ते माझ्यावर टीका करतात, माझ्या वडिलांवर, आजी – आजोबांविषयी बोलतात. तिरस्काराने बोलतात. मी मात्र त्यांना झप्पी देतो. असे ते म्हणाले. ते मध्यप्रदेशातल्या शुजलपूर या ठिकाणी बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.