InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘मी राजीनामा मागे घेणार नाही ‘; राहुल गांधींचा राजीनामा मागे घेण्यास नकार

राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहावं, अशी मागणी खासदारांनी केली. मात्र राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी राहण्यास नकार दिला. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या लोकसभेतील खासदारांची बैठक झाली. या बैठकीला राहुल गांधी उपस्थित होते.

बैठकीला उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या सर्व ५१ खासदारांनी राहुल यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मात्र राहुल राजीनाम्यावर ठाम राहिले. लोकसभा निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असल्याचं काँग्रेस खासदार शशी थरुर आणि मनीष तिवारी यांनी म्हटलं. त्यावर पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचं राहुल म्हणाले.

युवक काँग्रेसच्या सदस्यांनी राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी करत राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला. राहुल यांनी अध्यक्षपदी कायम राहण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. मात्र राहुल यांनी राजीनामा मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या – 

लोकसभेनंतरही राष्ट्रवादीला आणखी एक धक्का? खासदार भाजपच्या वाटेवर?

सोन्याच्या दारात ऐतिहासिक वाढ; गेल्या सहा वर्षातील उच्चांक गाठला

लोककल्याणकारी राजा ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज’

‘यांचं पाणी कनेक्शन तोडा, येऊ द्या यांना बिना आंघोळीचं’; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

‘बैलगाडा शर्यत केवळ करमणुकीचे साधन नाही’; संसदेत ‘डॉ.कोल्हें’चे जोरदार भाषण

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply