InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राहुल गांधी यांना शिवडी कोर्टाकडून 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध भाजप व आरएसएसच्या विचारसणीशी जोडला होता. यानंतर आरआरएसएसच्या एका कार्यकर्त्याने राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीचा दावा दाखल केला होता. या दाव्यावरील सुनावणी माझगाव महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे आज होती. याच निकाल नुकताच लागला असून राहुल गांधी यांना शिवडी कोर्टाकडून 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर झाला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व व्यवसायाने वकील असलेले धृतीमान जोशी यांनी राहुल गांधी, काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि सीपीआयचे नेते सीताराम येचुरी यांच्याविरोधात माझगाव दंडाधिकाऱ्यांपुढे खासगी तक्रार केली होती. फेब्रुवारी महिन्यात दंडाधिका-यांनी राहुल गांधी व येचुरी यांना समन्स बजावला.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply