“काँग्रेसच्या अस्तित्वासाठी राहुल गांधींना मजबूत टीम तयार करावीच लागेल”

मुंबई : उत्तर प्रदेशातील नेते जितीन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमधील खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे. राजकीय विश्लेषकांकडून काँग्रेसच्या भवितव्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काँग्रेसचा राज्यातील मित्र पक्ष शिवसेनेनं देखील काँग्रेसच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना पक्षाला काही सल्ले दिले आहेत. त्याचवेळी, जितीन प्रसाद यांच्या निमित्तानं उत्सव साजरा करणाऱ्या भाजपलाही टोले हाणले आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जाणारे जितीन प्रसाद यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. यूपीतील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षांतराची चर्चा जोरात आहे. त्यावरून काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वावर टीका होऊ लागली आहे. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून यावर भाष्य केलं आहे.

यानंतर आता महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ वगळता काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल, असा सल्ला शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला दिला आहे.

दरम्यान, अहमद पटेल, राजीव सातव यांच्या निधनाने आधीच काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात त्या पक्षातील काही तरुण नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला हे बरे नाही. काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा