InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना काही आश्वासने दिली होती. ती आश्वासने त्यांनी पूर्ण करावी. तसेच यावेळी केरळ सरकारच्या मोरेटोरियमवर रिझर्व्ह बँकेने लक्ष घालण्याची विनंती सरकारने करावी. कर्जाच्या वसूलीसाठी शेतकऱ्यांना नोटीस पाठवून बँकांनी त्रास देऊ नये, यावरदेखील सरकारने लक्ष द्यावे, असेही राहुल यावेळी म्हणाले. यावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तर देत काँग्रेसला धारेवर धरले.

नुकतीच वायनाडमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.  गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारने 5.5 लाख कोटी रूपयांचे मोठ्या व्यावसायिकांचे कर्ज माफ केले. दरम्यान, सरकार अशी दुहेरी भूमिका का घेत आहे, असा सवाल राहुल गांधी यांनी लोकसभेत केला. तसेच शेतकऱ्यांना केरळ सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ पोहोचवण्यातही बाधा येत असल्याचे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

मध्यस्थांच्या अहवालाची वाट पाहू, अन्यथा २५ जुलैपासून सुनावणी- सुप्रीम कोर्ट

सगळे फुटीरतावादी एकाच माळेचे मणी- सेनेचा निशाणा

काँग्रेसच संसद परिसरात धरणे आंदोलन सुरू

शालेय पोषण आहाराचा माल खाजगी दुकाणावर विक्री करताना पकडला

कसारा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply