Rahul Gandhi PC | “मै आपका नौकर रहना चाहता हूँ”, सावरकरांचे पत्र फडणवीसांनी वाचावं; राहुल गांधी वक्तव्यावर ठाम
Rahul Gandhi PC | अकोला : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रातील अकोला (Akola) जिल्ह्यात आहे. राहुल गांधी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी (Rahul Gandhi) ठाम राहीले. यावेळी राहुल गांधी यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेले पत्र वाचून दाखवले. राहुल म्हणाले की, सावरकरांनी घाबरून इंग्रजांची माफी मागितली, पण गांधीजी, नेहरू आणि पटेल यांनी तसे केले नाही. सावरकरांचे पत्र दाखवत राहुल गांधींनी शेवटची ओळही वाचून दाखवली. ‘मै आपका नौकर रहना चाहता हु’, असे सावरकरांनी लिहिले होते, असे राहुल गांधी म्हणाले.
यावेळी राहुल गांधी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावरकरांचे पत्र बघायचे असेल तर त्यांनीही बघावे, असे राहुल गांधी म्हणाले. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली होती. मी यावर अगदी स्पष्ट आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, या यात्रेमुळे देशाचे नुकसान होत आहे असे सरकारला वाटत असेल तर त्यांनी यात्रा थांबवण्याचा प्रयत्न करावा.
राहुल गांधींनी पत्रकारांच्या प्रश्नाला रोखठोक उत्तरे दिली. राहुल गांधी म्हणाले, “गेल्या आठ वर्षापासून भारतात भितीचे वातावरण आहे. द्वेष आणि हिंसेचे वातावरण तयार करण्यात येत आहे. भाजपचे नेते मंडळी भारतातील शेतकऱ्यांशी चर्चा करत नाहीत. युवकांशी ते चर्चा करत नाहीत. त्यांनी चर्चा केली असतील तर त्यांना समजले असते की शेतकरी आणि युवकांना समोरचा रस्ता दिसत नाही. बेरोजगारी वाढत आहे. महागाई वाढत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. या विरोधात उभे राहण्यासाठी आम्ही भारत जोडो यात्रा सुरु केली आहे.”
मराठीत प्रश्न विचारण्याचा आग्रह –
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या विदर्भातील अकोला जिल्ह्यात आहेत. ग्रामिण विभाग असल्यामुळे मराठी भाषिक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र राहुल गांधींना मराठीत प्रश्न विचारावे की हिंदीत, अशी धांदल पत्रकारांची उडाली होती. संयोजकांनी हिंदीत प्रश्न विचारा म्हणून पत्रकारांना विनंती केली. मात्र यावेळी राहुल गांधी म्हणाले, मराठीत प्रश्न विचारा, ते चांगलं राहील. मराठी मला समजते.
महत्वाच्या बातम्या :
- Rahul Gandhi PC | मराठीत प्रश्न विचारा, मराठी समजते – राहुल गांधी
- Uddhav Thackeray | “…अशा मातृसंस्थांच्या पिल्लानी आम्हाला सावरकरांविषयी प्रश्न विचारू नये”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
- ICC Ranks | टी 20 मध्ये पुन्हा भारतीय संघ आघाडीवर, विश्वचषक जिंकून इंग्लंड भारताच्या मागे
- Shinde vs Thackeray | “आधी मातोश्री पवित्र करावी” ; शिंदे गटातील आमदाराचा घणाघात
- Sanjay Raut | “राजकीय स्वार्थासाठी इतर नेत्यांना भारतरत्न दिला, मग…”, संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक सवाल
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.