राहुल गांधी यांनी जनाची नाहीतर मनाची लाज असेल तर देशाची माफी मागावी – चंद्रकांत पाटील

- Advertisement -
राफेल विमान कराराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी अडचणीत आले होते. दरम्यान, याबाबत राहुल गांधी यांनी दिलेला माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्यानंतर आता भाजपाने राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
- Advertisement -
Loading...
राहुल गांधींनी माफी मागावी यासाठी भाजपाने आज देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी जनाची नाहीतर मनाची लाज असेल तर देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
Related Posts
राफेल विमान कराराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आल्यानंतर भाजपाने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच चौकीदार चौर है म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राळ उडवणाऱ्या राहुल गांधी यांनाही न्यायालयाचा संदर्भ देऊन आरोप केल्याने सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर करावा लागला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजपाने आज देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. मुंबईत भाजपाच्या वसंत स्मृती येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेसुद्धा उपस्थित होते.
Loading...