InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बाळासाहेबांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत भाजप नेत्याचा शिवसेनेवर निशाणा

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालेल्या राजकीय स्थितीमुळे राज्यात ऐतिहासिक आघाडीचा उदय झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. मात्र शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याच्या निर्णयावरुन भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी बाळासाहेबांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

पात्रा यांनी ट्विटवरुन बाळासाहेबांच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये “मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस कधीच होऊ देणार नाही. मला जेव्हा कळेल की शिवसेना काँग्रेस झाली आहे. तर मी माझं दुकान बंद करेन असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. मात्र आता राहुल गांधीच शिवसेनेचं दुकान बंद करतील असं वाटतंय,” असा टोला पात्रांनी लगावला आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.