InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘काँग्रेस विसर्जित करण्याचं महात्मा गांधींचं स्वप्न राहुल गांधी पूर्ण करणार’

लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असलेल्या एनडीएला मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिले. तर दुसरीकडे ७० वर्ष सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाला घरी बसवले. यामागे मुख्य कारण म्हणजे, काँग्रेसला नेहरू गांधी परिवाराने स्वतःचा पक्ष म्हणून चालवले, परिवाराव्यतिरिक्त इतर कुठल्याही नेत्याला पक्षाची जबाबदारी सोपवणे या कुटुंबाला जमले नाही. असे मत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा सदस्यता अभियानाचे राष्ट्रीय संयोजक शिवराजसिंह चव्हाण यांनी आज नागपुरात व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस मोठ्या संकटात सापडला आहे. पराभवाची जबाबदारी घेण्यास कुठलाही नेता पुढे आला नाही. त्यामुळे शेवटी पक्षाच्या अध्यक्षाला आपला राजीनामा द्यावा लागला. ज्या पक्षाने देशात ७० वर्ष राज्य केले त्या पक्षाला अध्यक्ष मिळत नसल्याने काँग्रेस मोठ्या विचित्र परिस्थितीतून जात आहे. काँग्रेस विसर्जित करण्याचं महात्मा गांधींचं स्वप्न राहुल गांधी पूर्ण करणार असल्याची टीकाही त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply