InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘राहुल गांधी राजीनामा परत घेणार नसतील तर मी आत्महत्या करेन’

कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. तर त्यांचा हा निर्णय बदलावा व तेच कॉंग्रेस अध्यक्षपदावर कायम राहावेत, यासाठी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेक कार्यकर्ते त्यांची मनधरणी करत आहेत. याच मागणीसाठी कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्याने मंगळवारी सकाळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार कॉंग्रेस मुख्यालयाबाहेरच घडला. या ठिकाणी एक कार्यकर्ता मुख्यालयाबाहेर आला व झाडाला स्वतःला लटकावून घेऊ लागला. हा प्रकार पाहून आसपासच्या काही नागरिकांनी त्याला खाली उतरवले. कार्यकर्त्याने म्हटले आह की, जर राहुल गांधी राजीनामा परत घेणार नसतील तर मी या ठिकाणीच आत्महत्या करेन.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply