InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सोनिया गांधींच्या ‘या’ निर्णयामुळे लोकसभेतली राहुल गांधींनी पहिली जागा गमावली

- Advertisement -

लोकसभेत विरोधकांच्या पहिल्या रांगेत आता राहुल गांधी दिसणार नाहीत. काँग्रेसने लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून अधीररंजन चौधरी  यांचं नाव पुढे केलं गेलं. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनीच अधीररंजन चौधरींचं नाव सुचवलं होतं लोकलेखा समितीचा अध्यक्ष हे लोकसभेत मानाचं पद असतं. त्यांची जागासुद्धा पहिल्या रांगेत असते. त्यामुळे अधीररंजन यांना पहिल्या रांगेत जागा मिळेल. पण त्यामुळे राहुल गांधी यांना मात्र लोकसभेत पहिल्या रांगेतलं सीट मिळण्याची चिन्हं नाहीत.

काँग्रेस संसदीय गटाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी आणि PAC अध्यक्ष म्हणून अधीररंजन चौधरी यांना पहिल्या रांगेत बसता येईल. या दोघांशिवाय पहिल्या रांगेत राहुल गांधी यांना सीट देण्याची मागणी काँग्रेसने केली होती. पण काँग्रेसची ही मागणी फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी पहिल्या रांगेत दिसणार नाहीत. त्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या रांगेत जागा दिली जाईल

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.